Wednesday, May 16, 2012

साहित्यसंस्कृतीवर वाचा
मनीषा साधू यांची कथा- जागच्या जागी
www.sahityasanskruti.com

आज मात्र त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागलं.अंथरूणात पडून राहाणं जड होऊ लागलं. दोन्ही कुशीवर वळून त्यांनी काही मिनिटे काढली.पालथं झोपून काही मिनिटे.किती वेळ गेला?फक्त सात मिनिटे?भडभडतंय का जरासं?त्या आतून पोटाच अदमास घेतात.अं...जरासं..थोडावेळ गुडघे पोटाशी घेऊन बसतात.पाय सरळ करतांना गुडघ्यात कळ निघते.तोंडावाटे ती बाहेर पडून इतरांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्या आवेगाने ’अंममम...’करीत ओठ घट्ट मिटून,टोंगळ्यावर हात दाबून कळ गिळतात.आता मात्र उठल्याशिवाय चैन पडायची नाही असं वाटून अंथरूणात उठून बसतात.उठून घरात फिरल्यावरच्या संभाव्य गोष्टींची उजळणी करतात.कितीही नाही म्हटलं तरी स्वयंपाकघरात पाण्याच्या भांड्यांचा आवाज होणारच.जुनं लायटर कट्ट,कट्ट,कट्ट करीत मोठमोठ्यानं सहा-सात आवाज केल्याशिवाय गॅस पेटवणार नाही.अगदी हलक्या हातानं पेला काढू म्हटलं तरी दोन -तीन पेले वाट्या एकमेकांवर नकळत आदळून टणाटण आवाज होणारच.त्यातच अनावधानाने हातून एखादी ताटली खाली पडलीच तर मोठ्याने आवाज करीत ती जमिनीवर उभी गरागरा फिरणार. मग कंबरेचं दु:ख विसरून त्या कडकन वाकून तिला झपकन जमिनीवर दाबणार.त्याचाही आवाज होणारच.मात्र त्या नंतर होणारे आवाज त्यांना कल्पनेतही जास्त असह्य होतात.शिवाय उभं राहतांना कंबरेच्या निखळलेल्या हाडाला त्यांचं कडमडतं सकाळी लवकर उठणंच तर जबाबदार असतं.

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits