न पूछ दिल की हकीकत मगर ये कहते है
’झीमराठी’ वाहिनीवर ’पिंजरा’ या मालिकेचा १०० वा भाग झाला. प्रसारित त्यामधे काठापदराची साडी, डोक्यावर पदर, सारा गाव ज्यांना देवता मानतो अशा आक्का जेव्हा ’मी कुणाचाही खून केलेला नाही.’ हे विधान करतात तेव्हा ते वाक्य ऐकल्यावर कुणाचीही प्रतिक्रिया ’खर की काय? आणि केव्हापासून?! अशीच होते. त्यामागची कारणेही तशीच आहेत! ’शांती’ आणि’ ’अवंतिके’पासून आठवून पहा काय केले तुम्ही! सुंदर चेहरा असणारी ही मुलगी पडद्यावर खोटे बोलते, कपटी आहे, पाताळयंत्री आहे हे आम्हाला माहिती आहे.
आक्का, नजरेतला विखार, आवाजातली जरब, छ्दमी हसू , कुटील कारस्थान अशी हत्यार चालवत तुम्ही किती जणांना घायाळ केले याचा हिशोब ठेवायला ह्वाच ! दोष तुमचा नाही , जितका जीव ओतून आणि सहजतेने तुम्ही भूमिकेत शिरता ती क्षमताच याला कारणीभूत आहे. !
स्टार, सोनी, झी यातल्या हिंदी मालिका(शांती, सॆटरडे सस्पेन्स, ९ मलबार हिल, जाने कहा मेरा जिगर गया जी,सिंदूर, संगम, कर्म, फिल्म , ऐसे ना करो विदा, संभव असंभव)आणि त्यातला तुमचा वावर बघितला की तुम्ही मराठी आहात याचाच विचार काहींना पडला तर नवल काय? पण गंमत अशी आहे की जे मराठी नाहीत, जे महाराष्ट्राबाहेर आहेत, जे हिंदी मालिकांचे चाहते आहेत त्यांना तुमचे नाव तर माहितीच आहे पण तुमचे हिंदी मालिकांत असणेही त्यांनी गृहित धरले आहे. दशकाहून अधिक काळ तुम्ही विविध भूमिका समर्थपणे केल्या ,अनेकदा नेहमीचा आवाज, उच्चार, वेशभूषा असे सर्व बेअरींग बदलून स्वत:ची वेगळी आणि नवी ओळख निर्माण केली.
आतापर्यंत बहुतेकांना मी कोणाबद्दल बोलते आहे ते लक्षात आले असेल. आणखी काही क्लू हवा असेल तर अमिताभ बच्चनसमोर जखमी चेहरा घेऊन येणारी ’ऐतबार” मधली वेश्या किंवा एका सत्य कथेवर आधारित असलेल्या गेल्या वर्षीच्या ’अंतरव्दंद्व’ चित्रपटामधली मुलीची आई आठवा. उंचपु-या आणि घारे डोळे असणा-या ,मराठी हिंदी टेलेव्हिजनवर गेली दहा पंधरा वर्षे दिसतात अशा खर तर एक दोनच नट्या आहेत. हे सर्व चेहरे डोळ्यासमोर येताच प्रतिक्रिया एकच असेल- ओह! ती सुमुखी पेंडसे! पण सुमुखी पेंडसे हिची केवळ हीच एक ओळख म्हणजे तिच्यावर अन्याय आहे.
’या सुखांनो या” आणि ’माझिया प्रियाला प्रीत कळेना” मधे ब-याच काळानंतर हा चेहरा मराठी टेलेव्हीजनवर दिसला. ’सरीवर सरी’ या मराठी चित्रपटातला सिनियर मॊडेलचा रोलही डोळ्यासमोर आला. पिंजरा मालिकेत ’’आक्का” या मह्त्त्वाच्या भूमिकेत यावर्षी तोच चेहरा पाहून हे सगळ्या सुट्या, विखुरलेल्या, चित्रांचा कोलाज एकदम पूर्ण झाला. जे मनात आहे ते व्यक्त करायला केल पाहिजे अशी बोच लागली.
it's high time that we recognize your name, your contribution , your dedication towards performing arts and tell you how much we love you!
’इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी” या बालनाट्यात सुमुखीने इंद्राणीची भूमिका केली होती. तिथूनच तिचा रंगमंचावरचा प्रवास सुरु झाला. राजीव नाईक यांनी लिहिलेल्या ’आपसातल्या गोष्टी” या नाटकाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे हिने केले होते. त्यात सुमुखीबरोबर किशोर कदम आणि सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऐन वसंतात अर्ध्या रात्री, ऑथेल्लो यानंतर अनेक वर्षांनी सुमुखी रंगमंचावर आली ’स्थळ स्नेहमंदिर’ या नाटकात! वृद्धापकाळामुळे निर्माण होणा-या समस्या हा आज सर्व जगातच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमुळे या समस्येला वेगळे कंगोरे प्राप्त झाले आहेत. या सर्वांचा उहापोह अभिराम भडकमकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाने केला . भरजरी साडी, ज्वेलरी, मेकअप, हातात वाईनचा ग्लास, मॊडर्न आऊटफिट आणि हिंदी भाषा हे आपल्या सर्वांना जास्त परिचित असलेले सुमुखीचे रूप या भूमिकेत नाही. सुमुखी त्या नाटकात तितक्यात सहजतेने आणि आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरली . ही भूमिका पाहिली तर सुमुखी असे वेगळे कामही करू शकते? किंवा मग ती इतर भूमिका का करते ? हे प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. याच भूमिकेकरता सुमुखीला २००८ सालचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून झी गौरव पुरस्कार मिळाला.
सुमुखी आर्किटेक्ट आहे, तिने सोशॊलोजी मधे एम ए केले आहे. तिला वाचनाची आवड आहे, ती उत्तम जर्मन बोलते. मुंबईटाईम्समधे खास तरूणाईकरता ’हॆलो’ नावाचा स्तंभ सुमुखीने चालवला, ईटिव्ही करता ’आपलच घर’ चे लेखन आणि दिग्दर्शनही तिने केले . मालिका आणि सिनेमात ’स्टेरियोटाइप’ रोल सुमुखीला मिळाले पण ”नो प्रोब्लेम” नावाचा रात्री दहाला लागणारा एक ’ऎड्ल्ट कॊमेडी शो’ आठवून पहा. हे चाकोरीबाहरचे कामही तिने तेवढ्याच आत्मविश्वासाने केले. ’शांती” मालिकेमधली ’आयेशा’ ही सुमुखीची सर्वाधिक आवडती व्यक्तिरेखा आहे,तिच्यामुळेच सुमुखीची टेलेव्हिजन क्षेत्रातली कारकीर्द सुरुवात झाली. एवढेच नाही तर खलनायिकेचे काम करणेही तेवढेच आव्हानात्मक असते, त्यात वेगळी गंमत असते हे कळले असे सुमुखी म्हणते.
’एका रात्रीत मिळणारे स्टारडम अनेकांना दिसते, हवे असते. पण ते कायम टिकत नाही हे कळायला वेळ लागतो. या क्षेत्रात अनेक तरूण, नवे चेहरे येतात आणि जातात असे दिसते. जी मंडळी त्यांच्या कामाकडे लक्ष देतात, काही वर्षे टिकतात, मेहनत करतात, आवश्यक तसे स्वत:ला बदलतात तेच इथे यशस्वी होतात ’ असे सुमुखी म्हणते. ’नव्या येणा-या प्रत्येकाबरोबर काम करतांना, उत्साह वाढतो आणि सध्याच्या काळात लोकांचा, तरूण पिढीचा दृष्टीकोन कसा आहे , त्यांचे विचार काय आहेत हे समजत’ असे तिचे मत आहे.
’पिंजरा’ मधली आक्कांची भूमिका इतर भूमिकांपेक्षा वेगळी तर आहेच आणि आव्हानात्मकही आहे म्ह्णूनच ती सुमुखीला आवडते. शांती, अवंतिकामधे सुरुवातीपासून तिला बघणा-या रसिकांनाही अक्कांची भूमिका बेहद्द आवडली आहे. ही भूमिका सुमुखीला आणखी नामांकने आणि पुरस्कार मिळवून देईल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment