Wednesday, March 17, 2010

कशासाठी ?पोटासाठी..!.निवड आणि परिणाम

कशासाठी? पोटासाठी. निवड आणि परिणाम..!
आई मला वरण भात खायचा नाही.. काय ते सारख इंडीयन फूड.. असा आमच्याकडे घडणारा रोजचा संवाद असतो.
इतर घरे सुद्धा अपवाद असतील असे नाही. पण जे आवडत ते इंडियन फूड चालत( पनीर, भेंडीची भाजी पुलाव, पुर्‍या, भजी, चिवडा लाडू, गाजर हलवा, शीरा आणि गुलाबजाब अशी यादी म्हणू).अमेरिकेत काही भागात भारतीय भाज्या मिळत नाहीत, मुळात दिसायला एकदम टवटवीत आणि बारा महिने मिळत असले तरी भाजी आणि फळांना चव नाही, त्यामुळे जास्तीत घराघरात जास्त मसालेदार जेवण करण्याकडे कल दिसतो. एवढ करूनही पदार्थ भारतात आपल्या घरात असतात तसे लागत नाहीतच. हा केवळ समज नसून यात तथ्य आहे. अमेरिकेत किंवा सर्वसाधारणपणे भारताबाहेर राहणारे सर्व भारतीय जास्तीत जास्त भारतीय आहार कसा कायम ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात पण ती चव कायम ठेवणे नेहमीच शक्य होत नाही. भारतीय हॉटेलात पदार्थांचा रंग पाहिला की पालक पनीर असे हिरवे दिसते की अंगावर येते, कोफता करी इतकी रंगीत दिसते की त्यात रंग मिसळला आहे हे कुणीही सांगेल. पण रंगात काय असते, ते किती चांगले याचा विचार करायला वेळ कुणाला आहे? बस्स भारतीय जेवण कमीत कमी कष्टात आणि किती सहज याकडे लक्ष असते. भारतातून किती लोणची, मसाले आणणार? दाण्याचे कूट, तिळाचे कूट, धना जिरा पावडर, गरम मसाला, गोडा मसाला सगळे किती आणायचे आणि किती स्वतः करायचे? पावभाजी मसाला, रस्सम मसाला याचे काय? शेवटी अगदी रोज नाही तरी समारंभांना पार्ट्यांना उघड पाकीट घाल मसाला, वापर तयार मिक्स अशी सवय होते.
रुपये आणि डॉलर चे समीकरण हळू हळू मागे पडते, नव्या चवीचा स्वीकार होतो आणि अमेरिकेत स्थाईक भारतीय आपले आयुष्य चवीने चाखू लागतात. उघड कॅन घाल छोले, उघड डबा खा रसगुल्ला .. शिवाय हे सर्व किती ताजे आणि किती चांगले आहे याचा भडिमार भारतीय टीव्ही करत असतोच.
भारतातून आलेली एखादी आजी म्हणते ही कणीक वेगळी आहे, हा मसाल फारच रंगीत आहे, याला जसा कृत्रिम वास आहे.. आपण कानाडोळा करतो, कधी कष्ट घ्यायचे नसतात तर कधी नाईलाज असतो तर कित्येकदा नव्याचा हव्यास! आणि तेच सगळे चांगले चा घोषा!

अनेक विद्यार्थी, एकटे राहणारे नोकरदार यांच्या करता भारतीय पाकीटबंद 'दो मिनिट खाना' म्हणजे उत्तम सोय आहे.
मग अचानक कुणाच्या तरी मेडिकल रिपोर्टमधे असे काही निघते त्याने किमान काही जणांचे डोळे उघडतात. या सर्वाचा फटका बसतो अनेकवेळा लहानग्यालाच! ताजे अन्न खा, आहार विहाराकडे लक्ष द्या हा नियम फक्त आजारी माणसाला आणि गर्भवती महिलांना लागू नसून सर्वांना आहे.भारतीय दुकानात मिळणारे अनेक तयार मसाले ,हळद, हिंग इत्यादीत लेड (शिसे) चे प्रमाण धोकादायक आढळले आहे. चायनीज हॉटेलात नो एम्एसजी अशा पाट्या असतात तशा 'नो लेड इन स्पायसेस' अशा पाट्या भारतीयांना लावाव्या लागतील.. तरी परिस्थिती किती सुधारेल आणि काय खरे काय खोटे हे तुम्हा आम्हाला माहिती आहे. अमेरिकन पदार्थातही अशी धोकादायक भेसळ होत असते , ती सापडते त्यावर उपाय शोधला जातो ही सर्वसाधारण पद्धत आहे. जपानी कार्स , चायनीज फूड, भारतीय मसाले आणि पर्यायाने माणसे हे सर्व अमेरिकेला नकोसे झाले आहे असे कुणी म्ह्टले तरी भारतात गुणवत्ता आणि नफातोटा याचे गणित कसे सोडवतात यावर दुमत नसावे!म्हणून 'वेक अप इंडियन्स' अजून वेळ गेली नाही असेच म्हणायला पाहिजे.

दोन करियर्स, मुले, भारताबाहेर राहून आवडीनिवडी, भारतीय वंशाचा जपणूक ही सर्व तारेवरची कसरत करतांना लक्षात फक्त एवढेच ठेवायचे आहे की आयुष्य एवढे सोपे नाही आणि सहज मिळते असे सुद्धा नाही. कसे जगायचे या प्रश्नाचे जे उत्तर असेल , तुम्ही जशी निवड कराल तसे फळ मिळेल. नशीबात जे असेल ते होईलच पण आपण कर्तव्य केले याचे समाधान मला जास्त महत्त्वाचे वाटते. आम्ही अमूक कपडे घालतो, आमचे घर असे आहे, आमच्याकडे या गाड्या आहेत, मुले अमेरिकेत कशी रूळली आहेत यापैकी कशाचे आणि किती गोडवे गायचे ती प्रत्येकाची निवड आहे. जे महाग आहे ते सर्व चांगले असे नाही. अनेकदा जास्त पैसा देण्यापेक्षा कष्ट करणे शहाणपणाचे ठरते. पण दोन उच्चशिक्षित माणसे घरात असतांना त्यांना योग्य निवड करता येत नसेल तर याहून दु:ख कोणते?
भारतात दिसते ते पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि भारताबाहेर जिथे राहतो तिथे आपण सामावून घेतले जावे याची धडपड यामधे नेमकी नक्क्की निवड कशी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण उत्तरावर अवलंबून आहे पुढच्या पिढीचे संगोपन आणि त्यांची जडणघडण!



5 comments:

  1. सहमत आहे. शेवटी आपण कशाला प्राधान्य द्यायचे हे आपल्याच हाती आहे. अनेकदा केवळ स्टेटस सिंम्बॉल या नावाखाली अतिरेक केलेला पाहायला मिळतोच. मग मुलेही त्याच वळणावर जाऊ लागली की त्रास होऊ लागतो. सोनाली, पोस्ट आवडली.

    ReplyDelete
  2. Very Nicely written Sonali!!

    ReplyDelete
  3. Very well said. I am one of the fool in other's eyes who tries to do things at home.

    ReplyDelete
  4. सोनाली, अगदी खरंय..काय इथल्या चवी.......
    काही म्हण जर भाज्यांनाही आपण चव आणू शकत नाही तर पोळीचं काय?? कधी वेळ मिळाला तर माझं पोळीपुराण वाच...
    http://majhiyamana.blogspot.com/2009/12/blog-post_18.html

    ReplyDelete
  5. Me ikade alyapasun baryachada mala he prashna satavtat. Mhanaje kitihi zala tari aplya tabbyeti peksha adhik mahatwachi goshta kaay aste. Ani apan paishyanchya mage lagun ikde yeun swatacha jevan, health yakade durlaksha karto. So very true !

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits