सर्व काही विसरलेले
झंझावात हा सुरेश भटांचा संग्रह आहे का?>तेंडूलकरांच्या दहा नाटकांची नावे काय आहेत? लता मंगेशकरचे पहिले गाणे कोणते? सध्या कोण वर्ल्ड कप सॉकर चा विजेता आहे? अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला आता आठवत नाही. पण या प्रश्नांची उत्तरे येणारी अनेक माणसे मला माहिती आहेत. या लेखकाने असे असे वाक्य या पुस्तकात या पानावर, या मुलाखतीत म्हटले असे संदर्भ देत नावानिशी कवितेच्या कथेच्या ओळीच्या ओळी धडाधड उद्धृत करत जाणार्या चालत्याबोलत्या माणसांबद्दल मला खूप आदर आहे. शिवाय त्यांची अशी माहिती एका लेखकाविषयी एका विषयासंबंधीच असते असे नाही शास्त्र, विनोद, चित्रकला, कविता, सिनेमा गाणि जगभरातले खेळ अशा नानाविध प्रांतात ते तेवढेच तरबेज असतात. अशा अनेक मित्रमैत्रिणी मला अहेत की ज्यांना मी माहितीकोश /संदर्भकोष म्हणते! कित्येकांचा हा स्वभाव असतो, अनेकांना ते प्रयत्नाने जमलेले असते.
वाचन असणे , माहिती असणे आणि नेमकी योग्य वेळी आठवणे आणि ती सांगणे ही एक कला आणि खासियत आहे असे मला वाटते. अनेकदा मला फार येत हे दाखवणे हा त्यामागचा हेतू असू शकतो ही एक शक्यत आहेच. पण त्याकडे आपण तूर्तास कानाडोळा करू या. वेगवेगळ्या वयोगटात असूनही काही व्यक्ती अनेक विषयांवर तेवढ्याच ताकदीने संदर्भासहीत बोलतांना दिसतात हे नाकारता येत नाही. न आठवण्याच / विसरण्याच माझ वय नाही किन्वा माझ्या काही लक्षातच राहत नाही असे नाही पण एक सिलेक्टिव्ह मेमरीच बटन मी नक्की केव्हापासून ऑन केले आहे माहिती नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा आस्वाद घेऊन, त्यांचे महत्त्व जाणले की मी पुढे जाते पण मला संदर्भ देता येत नाहीत. मला गाजलेल्या कविता , गाणी जशीच्या तशी इत्यादी आठवत नाहीत. मनात कायम राहिले आहे ते केवळ पाच ते बारा या कालावधित जे काही कळना न कळता निव्वळ घोकले तेचः) माझे दैनंदिन अनुभव असे गोष्टी विसरत असल्याचे असूनही सुदैवाने कोणत्याही रोगाची सुरुवात / चिन्हे माझ्या डॉक्टरला सापडलेले नाही. बाकी सर्व मला हे माह्ती पण .. अर्र... अशा थाटात घेत असते.
इतरांच्या नाहीच माझ्याही कवितेच्या ओळी मला आठवत नाहीत. कधी काळी एकदा वाचलेले अगदी जसेच्या तसे सांगता यायचे ते कसब कुठे गेले? कशामुळे आस्वाद घेऊन नंतर विसरण्याची वृत्ती जागी झाली? थिएरम्स, एक्वेशन्स , सगळ्यांना हा नियम लागू होतो. पण मग मी पत्ते फोन अथवा व्यक्तीच्या आवडीनिवडी कशा विसरत नाही?
हाताशी पुस्तक, गुगल असणे अशा विविध सोयींमुळे विसरले तरी चालते असे मनाला वाटते का? की अशा मोठमोठ्या याद्या देण्यात फार शहाणपणा नाही असे वाटते? योग्य वेळी मार्मिक संदर्भासहित बोलणे ही एक कला आहे. पण ती अनेकांना येत नाही तसेच माझे झाले आहे.
कुणीतरी नवे पाठांतर करून पाहिले किंवा सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याची सूचना मनाला दिली,जे वाचू ते कोणालातरी सांगितले तर फायदा होईल असे म्हटले आहे. तसा मी निश्चय केला आहे:) काही फरक पडतो का पाहू या.
लक्षात राहण्याकरता तुम्ही कोणते असे खास उपाय करता का? कोणाला माझ्यासारखाच अनुभव आहे का?
very thoughtful post! I am also in search of such personality. I have come across a number of them during my life. Late Shri. Sharachchandra V.Gokhale of Naigaon, Dadar, Mumbai (Not Pune's) was one of such people. Do you know, he was known as Pu.La.'s find ? I used to enjoy his meeting.
ReplyDeleteRegards.
Mangesh Nabar
मला पण आपण आधी काय लिहुन ठेवलंय ब्लॉग वर ते आठवत नाही. तुम्हा लोकांचे मराठी वाचले की कॉम्प्लेक्स येतो हो.. खूप सुंदर लिहिता तुम्ही लोकं मराठी मधे.
ReplyDeleteमला तर लोकांची नांवं पण लक्षात रहात नाही बरेचदा. मग एखाद्या पार्टी मधे भेटलो - की मी कोण?? ऒळखलं कां? असं विचारलं की कसानुसा चेहेरा करून सांगतो.. अरे वा.. तुम्हाला ओळखणार नाही कां? आणि मग नांव आठवत नसतांना पण गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो..
पोष्ट मस्त झाली आहे.
ReplyDeleteमाझं पण सेम टु सेम... बिनमहत्वाच्या गोष्टींची आपण दखल घेत नाही असं म्हणायचं आणि गप्प रहायच येवढचं मी करतो. :)
kharch as hot chehare ani nav lakshatch rahat nahi khup prayatna kela pn... aso andharyat teer sodayche kadhi lagto kadhi nahi
ReplyDelete