Friday, September 11, 2009

नेमक चुकत कुठे

गप्पा मारतांना आपण अनेक विषयांवर बोलतो. कित्येकदा आपल्या परिचित व्यक्तीविषयी बोलतो. एखाद्या व्यक्तिच्या मागे तिच्याविषयी आपण नकळत बोलत असतो. वाईटच असे नाही पण कित्येकदा त्या व्यक्तीविषयी , तिच्या जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दल आपुलकीने सुद्धा बोलतो. कधी कधी अशा गप्पा अचानक वेगळ्याच वळणावर येऊन थांबतात आणि मग अचानक मळभ दाटून येते आणि जे झाले , जे घडले त्यावर आपण विचार करत असतो.

नवरा बायकोची भांडणे हा नेहमीचाच विषय पण त्या भांडणातून एखाद्याचे घरच मोडतय अशी स्थिती येणे, घरातल्या चिमुरड्यावर एक आठवडा आई व दुसरा आठवडा बाबा कडे राहता येईल अशी कल्पनाच हादरवून सोडते. व्यसन, आर्थिक विविंचना , विवाहबाह्य संबंध यापैकी एकही कारण नसतात चांगले असणारे संबंध कसे आणि कशामुळे बिघडतात हा आजचा एक चिंतनाचा विषय आहे. दोन व्यक्तींच्या खाजगी गोष्टींमध्ये तिसऱ्याने बोलू नये . किंवा नक्की खरे काय ते सुद्धा बाहेर येतेच असे नाही. पण खरेच एका टोकाची वर्तणूक असेल तर ती लपूनही राहत नाही.

आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना आता एवढ्या वाढल्या आहेत का की चिमुरड्या जिवाचे भले कशात ते समजूनही आपण माघार घेत नाही? शिक्षणाचा, आर्थिकदृष्ट्या सबल झाल्याचा मध्यमवर्गीय घरात आता असा परिणाम तुम्हाला दिसतो आहे का? मुले मुली एकतर लवकर लग्नाचा निर्णयच नक्की खात्री पटल्याशिवाय घेत नाहीत. मग सगळे सामंजस्य, जबाबदारी जाते कुठे?जे घडत त्यात चिमुरड्यांचा काय दोष?


नेमक चुकत कुठे

यावर मला काय वाटत ते ऐका.


lagn pahave karoon...

1 comment:

  1. अहो लग्नाची भीती वाटायला लागलीये. अहंकाराचा वारा सगळ्यांच्या डोक्यात आहे. लग्न म्हणजे टेंशन आहे. तुमची ही ऑडीओ पद्धत चांगली आहे. १० पाने वाचण्या पेक्षा ऐकणे केव्हाही बरे. ~ धन्यवाद.

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits