अमेरिकेत राहतांना अथवा एकंदरीतच भारताबाहेर असतांना आपले सणवार कधी येतात आणि जातात त्याचा पत्ता लागत नाही. मनात खूणगाठ बांधली तरच सणवार आलेले कळतात. अर्थात हे साहजिकच आहे. आता आपल्या सणांबरोबर इथे साजरे होणारे हॅलोविन, थॅक्स गिव्हिंग आणि ख्रिसमस काही विशेष प्रयत्न न करता कळतात हे मात्र खर. भारतात अस भारतात तसची माझी रेकॉर्ड सुरु असते, सुदैवाने मुलांना काही प्रमाणात झी टिव्हीवर काही कार्यक्रमातून त्या सणांची ओ़ळख मराठी मंडळाशिवायही होते. सुरुवातीची चार पाच वर्षे जसे अमेरिकन विशेष दिवस ल़क्षात ठेवायला मला प्रयत्न करावे लागायचे तसे आता या सणांकरता मुलांचे होते.
मनात चालू असणार्या विचारांचे हे एक मंथन ऐका.
|
No comments:
Post a Comment