जर्मन बेकरीत स्फोट, माय नेम इस खान, बाळासाहेब, मनसे ... भारतीय क्रिकेट संघाचा विजय, साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन अशा बातम्यांनी पेपर रोजच भरतात.भरीला भर सासू सून, शेतकरी आत्महत्या असतातच. नेमक काय आम्हाला हव आहे आणि काय दिल तर आपले दुकान चालेल हे मिडियाला अवगत आहे ही गंमत आहे. त्यामुळे कशाची बातमी करायची आणि कशाची नाही ते त्यांच्या हातात असत. ही त्यांची ताकद आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा ते ज्यांना कळत ते यशस्वी असे समीकरण.. या सगळ्या गदारोळात वॅनकुवर , कॅनडा विन्टर ऑलेंपिक्स झाले..अमेरिकेला पदके मिळाली... बराक ओबामाचे नाव रोज दिसले, बर्फ पडायचे तो तिथे पडलाच. गॉसिप, सल्ले, नविन सिनेमा येत राहिले. त्याच वेळी शिखरावरून पाताळात गेलेल्या टायगर वूडस ने डोके वर काढून एक जाहीर माफिनामा वाचून दाखवला.... त्याच्या बायकोला काय वाटले, तो काय करेल सगळे आधीच ठरलेले आहे मग हे नाटक कशासाठी? सेलेब्रिटी करतात ते काय खर काय खोट?असो. त्याचा समाचारही माध्यमाने यथोचित घेतला...
काय खर काय खोट आहे टायगर वूडस?
तमाम आफ्रिकन अमेरिकन लोकांना, सर्व अमेरिकन लोकांना आपलासा वाटणारा त्यांचा लाडका वूडस आणि जाहीर माफीनामा? छे .. काय खर आहे ?काय खोट आहे एवढही लोकांना कळत नाही का?एखाद्या सराईत नटाप्रमाणे , योग्य ती आधीच पाठ केलेली संवादफेक करून वूडस ने माफी मागितली..सगळ्या नाटकाचा हा कळसच म्हणावा लागेल. आपल्या अनेक विवाहबाह्य संबंध प्रकाशात आल्यानंतर वूडस पहिल्यांदा जाहीरपणे काही निवडक लोकांसमोर येत होता तेही माफीमागण्याकरता...सगळ किती नाटकी ढोंगी आणि तरी झगमगणार वाटत नाही?
अनेक वर्तमानपत्रे म्हणतात त्याप्रमाणे तो सगळा प्रकार अतिशय नाटकी वाटला . पण सर्वांनी त्याचे भांडवले केले हे सुद्धा सत्य. एकदा का प्रसिद्धीच्या वलयात आला की मग माणसाचा आत्मासुद्धा विकला जातो का? टायगर वूडस कोणत्या तोंडाने आता पुन्हा संसार करणार्,खेळणार आणि जिंकणार ते तोच जाणे. पण त्याच्या चेहर्यावर जे काय म्हणून कमावलेले अपराधी भाव होते त्याने किती मुलींना तो आणि त्याचा पैसा हवाहवासा वाटणार हे कळेलच
No comments:
Post a Comment