अ पॅक ऑफ लाईज
आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तण वाढाव तस मोकाटपणे, आईच्या प्रेमळ छत्राशिवाय वाढलेल्या आणि आयुष्यात भरकटलेल्या जिनी या मुलीची कथा आहे 'अ पॅक ऑफ लाईज' . उर्मिला देशपांडे या लेखिकेची ही पहिली कादंबरी आहे .
( आपल्या प्रवाहाविरुद्धच्या लेखनाने मराठीत गाजलेल्या गौरी देशपांडे या लेखिकेची उर्मिला मुलगी आहे. अर्थात या माहितीने इंग्रजी वाचकांना काही फार फरक पडणारही नाही.पण मराठी वाचकांना या कादंबरीतल्या घटना हिच्या आयुष्यात तर घडलेल्या नाहीत ना, हिच्या सभोतालच्या तर नाहीत ना असा विचार मना आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात उर्मिलाने ही पूर्णपणे सत्यकथा नाही असेच म्हटले आहे.)
सराईतपणे गांजा प्यावा तसेच हा कादंबरीची नायिका जिनी पुन्हा पुन्हा प्रेमात पडते. नैतिक अनैतिक याचा विचार न करत आपली वागणूक बदलत जाणारी जिनी- तिची स्वातंत्र्याचा पाठपुरावा, तिचे खाजगी आयुष्य उलगडून दाखवणारी ही कादंबरी. - साधारणपणे १९८० सालामधे मुंबईत घडलेली.
ही केवळ वासनेच्या आहारी गेलेल्याअ जिनीची गोष्ट नसून ही कहाणी आहे श्रीमंत आणि एकाकी जिनीची , ही कथा आहे तरूणीच्या आयुष्याच्या प्रवासाची, कथा आहे स्त्रीवरच्या नियमांना, अटींना केलेल्या विरोधाची झगड्याची आणि अखेर बंधनाची. हे पुस्तक वाचतांना त्यातली वाक्ये , प्रसंग आणि शब्दाची पकड, भाषेवरचे प्रभुत्व यामुळे वाचकाला प्रसंगी हसू येते, डोळ्यात पाणी येते तर कधी हे पुस्तक विचार करायला लावते.
ज्या ज्या उल्लेखाने वाचकाची उत्सुकता ताणली जाईल असा सर्व मसाला या पुस्तकात ठासून भरला आहे. आता सर्व उल्लेख आवश्यकच आहेत का .. मुद्दाम आहेत की कथेची मागणी हे ज्याने त्याने ठरवायचे आहेत. जिनीची कहाणी अशी आहे की लेखिकेला मात्र हा सर्व मसाला आवश्यक वाटला असावा हे नाकारता येत नाही.
बिझनेस सॅन्डर्ड च्या लोकप्रिय ५० पुस्तकाच्या यादीत या पुस्तकाने नंबर लावला आहे;(२००९ च्या) पहिल्या कादंबरीला मिळालेल्या या प्रतिसादाने लेखिकेचा उत्साह द्विगुणित झाला असेल यात शंका नाही. तिची दुसरी कादंबरी या वर्षी जूनअखेर प्रकाशित होणार आहे...
No comments:
Post a Comment